22.9 C
Latur
Thursday, October 2, 2025
Homeउद्योगदेशातील सर्व कुटुंबांकडे २५ हजार टन सोने

देशातील सर्व कुटुंबांकडे २५ हजार टन सोने

भारतीयांना सोन्याची ओढ सर्वाधिक दस-याला वर्षभरात सोने ४२ हजारांनी वाढले

नवी दिल्ली : भारतातील कुटुंबांकडे खुप मोठ्या प्रमाणावर सोने असून अमेरिकेसह चीन आणि जपानच्या एकत्रित सोन्याच्या साठ्यालाही टाकले मागे टाकले आहे. भारतातील लोकांकडे असलेले एकूण सोने अंदाजे २५,००० टन इतके आहे. हे अमेरिका, जर्मनी, चीन आणि अगदी आरबीआयकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यापेक्षाही जास्त आहे. भारतातील नागरिकांमध्ये सोन्याची क्रेझ अनोखी असून दस-याच्या दिवशी केवळ वर्षभरात सोने ४२ हजार रुपयांनी वाढले आहे.

सोने किंवा चांदीच्या दागिन्यांशिवाय लग्न अपूर्ण मानले जाते. लोक अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगी एकमेकांना सोन्याचे दागिने किंवा छोटे तुकडे भेटवस्तू देतात. भारतात सोने शुभ मानले जाते. शिवाय, सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्याला जास्त मागणी आहे. सोन्याच्या या क्रेझमुळे, भारतीय कुटुंबांकडे अंदाजे २५ हजार टन सोने आहे आणि हा आकडा दिवसागणिक वाढत आहे. परिणामी, भारतीय कुटुंबांकडे जगातील सर्वात जास्त सोने आहे.

भारतात सोने नेहमीच आवडते राहिले आहे. कारण ते महागाई, आर्थिक अनिश्चितता आणि चलनातील चढउतारांपासून संरक्षण म्हणून काम करते. लग्न आणि सणांच्या काळात त्याची मागणी आणखी वाढते. ग्रामीण रहिवासी त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेकदा सोन्याचा वापर तारण म्हणून करतात. सोन्याच्या किमतींमध्ये जागतिक चढउतार असूनही चीननंतर भारत सोन्याचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. भारतीयांच्या सोन्यावरील प्रेमाचा संदर्भ देत, एका संशोधन विश्लेषकाने मार्चमध्ये धक्कादायक आकडेवारी उघड केली.

त्यानुसार, भारतातील सोन्याच्या संपत्तीत फक्त एका वर्षात अंदाजे ७५० अब्ज डॉलर्सची वाढ झाली. यावरून गेल्या वर्षी देशभरात किती सोने खरेदी केले गेले हे दिसून येते. विश्लेषक ए.के. माधवन यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारताचा खासगी सोन्याचा साठा २५,००० टन आहे, जो अमेरिका, जर्मनी, चीन आणि अगदी रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त आहे.

सोन्याच्या मागणीत भारत जगात दुसरा
अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, रशिया, चीन, स्वित्झर्लंड, भारत, जपान आणि तुर्की यासारख्या देशांच्या मध्यवर्ती बँकांकडे असलेल्या एकूण सोन्याच्या साठ्याची तुलना भारतीय कुटुंबांकडे असलेल्या सोन्याशीही होत नाही. यावरून भारतातील लोक बचत किंवा गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोन्याला किती महत्त्वाचे मानतात हे दिसून येते.

काय आहेत कारणे?
मोठा खासगी साठा
देशभरातील कुटुंबांकडे वारसाहक्काने मिळालेले दागिने आणि गुंतवणुकीतून जमा झालेले सोने मिळून अंदाजे २५,००० टन आहे.

जागतिक तुलना
हा साठा जगातील अनेक देशांच्या एकूण सरकारी सोन्याच्या साठ्यापेक्षाही जास्त आहे.

सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व
भारतात सोन्याला केवळ एक मौल्यवान धातू न मानता, ते सांस्कृतिक परंपरेचा भाग आहे आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण ढाल मानले जाते.
महिलांचा सहभाग अधिक
या एकूण सोन्याच्या मालकीमध्ये महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

सुरक्षित गुंतवणूक
सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून भारतीय नागरिक सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक करतात त्यामुळे घराघरांत सोन्याचे प्रमाण जास्त आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR