28.9 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeराष्ट्रीयदेशात बांधल्या जाणाऱ्या सर्व बोगद्यांचे होणार 'सेफ्टी ऑडिट'

देशात बांधल्या जाणाऱ्या सर्व बोगद्यांचे होणार ‘सेफ्टी ऑडिट’

नवी दिल्ली : उत्तरकाशी बोगद्यात ४१ मजूर अडकून पडल्यानंतर आता भारत सरकारने देशात बांधल्या जाणाऱ्या सर्व बोगद्यांचे सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) अपघात रोखण्यासाठी देशात बांधल्या जाणाऱ्या २९ बोगद्यांचे सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. सेफ्टी ऑडिटच्या या कामात दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) अधिकारी एनएचएआय अधिकाऱ्यांना सहकार्य करणार आहेत.

या दोन्ही संस्था एकत्रितपणे चौकशी करून आठवडाभरात अहवाल सादर करतील, असे सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सरकारी निवेदनानुसार, “बांधकाम करताना सुरक्षा आणि उच्च दर्जाच्या मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी एनएचएआय देशातील सर्व २९ बांधकामाधीन बोगद्यांचे सुरक्षा ऑडिट करेल. यापैकी १२ बोगदे हिमाचल प्रदेशात आहेत, तर सहा जम्मू-काश्मीरमध्ये आहेत आणि उर्वरित बोगदे उत्तराखंडसह इतर राज्यात आहेत.

याशिवाय, देशातील बोगदा बांधकामाची प्रक्रिया अधिक मजबूत आणि सुव्यवस्थित करण्यासाठी एनएचएआयने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारांतर्गत, एनएचएआय आणि केआरसीएल प्रकल्पांसाठी बोगदा बांधकाम आणि उतार स्थिरीकरणाशी संबंधित सुरक्षा पैलूंचे डिझाइन, रेखाचित्र आणि पुनरावलोकन यासंबंधी तज्ञ सेवा प्रदान करतील. केआरसीएल बोगद्यांचे सेफ्टी ऑडिट देखील करेल आणि आवश्यक उपाययोजना सुचवेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR