16.2 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeराष्ट्रीयदिल्लीमध्ये आपसोबतची आघाडी फिस्कटली?

दिल्लीमध्ये आपसोबतची आघाडी फिस्कटली?

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी होण्यापूर्वीच तुटण्याच्या मार्गावर पोहोचली आहे. आपच्या एका सूत्राच्या हवाल्याने काँग्रेसने दिल्लीमध्ये ४ जागा मागीतल्या आहेत. यावर पक्षाच्या एका नेत्याने म्हटले आहे असे वाटते की काँग्रेसची आघाडी करण्याची इच्छाच नाही. तत्पूर्वी, काँग्रेस बरोबर आघाडीसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते.

खरे तर, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी काँग्रेसला ७ पैकी केवळ १ अथवा २ जागाच देऊ शकते, असे बोलले जात होते. महत्वाचे म्हणजे, पंजाबमध्ये आपण सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढणार असल्याचे आपने यापूर्वीच घोषित केले आहे. आम आदमी पार्टीचे नेते संदीप पाठक यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, आम्ही दिल्लीमध्ये काँग्रेसला एका जागेची ऑफर देत आहोत. मात्र, मेरिटचा विचार करता, त्यांचा एका जागेवरही दावा होऊ शकत नाही. एवढेच नाही, तर काँग्रेसने वेळेत उत्तर दिले नाही, तर आम्ही सहा जागांवर आमचे उमेदवार जाहीर करू, असेही पाठक यांनी म्हटले होते. जर दिल्लीमध्ये इंडिया आघाडी यशस्वी होऊ शकली नाही, तर तो काँग्रेससाठी मोठा धक्का असणार आहे. कारण विरोधकांची आघाडी अनेक राज्यांमध्ये विखुरताना दिसत आहे. कारण, बंगाल पासून ते काश्मीरपर्यंत विरोधी पक्ष एकला चलो रेच्या भूमिकेत दिसत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR