19.1 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीचे २६० जागांचे वाटप पूर्ण

महाविकास आघाडीचे २६० जागांचे वाटप पूर्ण

विदर्भ-मुंबईतील काही जागांचा निर्णय बाकी २० तारखेला काँग्रेसची पहिली यादी

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असून २८८ पैकी २६० जागांचा निर्णय झाला आहे. विदर्भ व मुंबईतील काही जागांचा निर्णय व्हायचा असला तरी २ दिवसांत निर्णय होऊन संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी २० तारखेला काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, असे सांगितले.

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून मंगळवारपासून उमेदवारीवर अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे जागावाटपाच्या चर्चा येत्या २ दिवसांत पूर्ण कराव्या लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. बीकेसीतील सोफिटेल हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत यांच्यासह मविआचे इतर महत्त्वाचे नेते यासाठी उपस्थित होते. यापूर्वी २१६ जागांबाबत आघाडीत निर्णय झाला होता.

आज आणखी ४४ जागांचा निर्णय झाला त्यामुळे २८८ पैकी २६० जागांबाबत आतापर्यंत निर्णय झाला. उर्वरित जागांबाबतचा निर्णय आता पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर हा निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. दरम्यान काँग्रेसचे नेते आणि विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी २० तारखेला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. समाजवादी पक्षाबरोबर चर्चा झाली आहे. त्यांच्यासाठी काही जागा सोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आज आमची बैठक झाली की, प्रत्येक पक्षाच्या कोट्यातून त्यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR