मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘पुष्पा २’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या तो व्यस्त आहे.
अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असून त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्याने आपल्या कृत्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनने दारू आणि तंबाखूची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. कोट्यवधी रुपयांची जाहिरात त्याने नाकारली आहे.
अल्लू अर्जुनला एका दारूच्या आणि तंबाखूच्या कंपनीने एका जाहिरातीसाठी विचारणा केली होती. या जाहिरातीसाठी अल्लू अर्जुनला १० कोटी रुपये मिळणार होते. पण अल्लू अर्जुनला कोणताही वाईट संदेश द्यायचा नव्हता. त्यामुळे त्याने ही जाहिरात करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.