22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयउत्तरेसोबत दक्षिणेतही भाजपची मुसंडी?, महाराष्ट्रात मोठा फटका!

उत्तरेसोबत दक्षिणेतही भाजपची मुसंडी?, महाराष्ट्रात मोठा फटका!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अखेरचा टप्पा आज पार पडला. आता ४ जूनला निकाल लागणार आहे. त्याआधी आज एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली. एबीपी सी वोटरने भाजप सत्ता राखण्यात पुन्हा यशस्वी ठरणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार कर्नाटकसह दक्षिणेतील इतर राज्यांत भाजपने मुसंडी मारल्याचे दिसत आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेशातही भाजपला मोठे यश मिळू शकते. मात्र, महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीत काटे की टक्कर दिसून येत आहे. दरम्यान, मॅटराईजच्या अंदाजानुसार देशात एनडीएला ३५३ ते ३६८ जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला ११८ ते १३३ आणि अन्य पक्षांना ४३ ते ४८ जागा मिळू शकतात.

यासोबतच केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजप खाते उघडण्याची शक्यता आहे. एबीपी-सीवोटरच्या एक्झिट पोलमध्ये केरळात एनडीएला १ ते ३ जागा मिळण्याचा अंदाज आहे तर यूडीएफला १७ ते १९ जागा तर एलडीएफला आणि इतरांना शून्य जागा मिळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात इंडिया आघाडीला १ ते ३ जागा तर एनडीएला २६ ते २८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच तेलंगणात एनडीएला ७ ते ९ जागा, इंडिया आघाडीला ७ ते ९ जागा आणि इतरांना ० ते १ जागा मिळत आहेत.
आंध्र प्रदेशात एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे. आंध्र प्रदेशात २१ ते २४ जागा एनडीएच्या खात्यात जाणार आहेत तर वायएसआरसीपीला ० ते ४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेशात इंडिया आघाडी शून्यावर येऊ शकते. निवडणुकीचे रणशिंग फुंकताना भाजपला सलग तिस-यांदा सत्ता राखण्याचा विश्वास असून एनडीएने ४०० पारचा नारा दिला तर सत्ताधा-यांविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. इंडिया आघाडीने भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत ३०० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला.

उत्तर प्रदेशात पुन्हा भाजप?
मॅटराईजच्या एक्झिट पोलनुसार भाजपला उत्तर प्रदेश मध्ये बंपर लॉटरी लागणार असल्याचे दिसते. एकूण ८० जागांपैकी एनडीएला ६९ ते ७४ जागा तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला ६ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलमध्ये बसपला एकही जागा मिळणार नसल्याचे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR