32 C
Latur
Friday, January 31, 2025
Homeमहाराष्ट्रट्रकभर पुराव्यात नाव नव्हते तरीही राजीनामा दिला

ट्रकभर पुराव्यात नाव नव्हते तरीही राजीनामा दिला

छगन भुजबळांची स्पष्टोक्ती

पुणे : तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरण कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. या प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता तब्बल २१ वर्षांनी छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळाप्रकरणी शरद पवारांवर निशाणा साधला.

छगन भुजबळ यांची पुण्यात आज प्रकट मुलाखत पार पडली. एका युवा संसद कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान बोलताना छगन भुजबळांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. या मुलाखतीत छगन भुजबळांना तेलगी घोटाळ्याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी माझी काहीच चूक नसताना माझा राजीनामा घेण्यात आला, असा मोठा दावा छगन भुजबळ यांनी केला. तेलगी प्रकरण दोन-तीन राज्यात होते, त्यामुळे मी सुप्रीम कोर्टात गेलो. हे प्रकरण सीबीआयकडे घ्या अशी मी मागणी केली. ट्रकभर कागद आणले. त्यात छगन भुजबळ हे नाव कुठेही नव्हते. ज्या प्रकरणी माझे नाव सीबीआयनेही घेतले नाही असे छगन भुजबळ म्हणाले.

राजीनाम्याची घाई शरद पवारांनी केली
उपमुख्यमंत्री म्हणून मला राजीनामा द्यावा लागला. गृहमंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी माथ्यावर हा तेलगी प्रकरणातील आहे, असा शिक्का बसला होता. मला शरद पवारांना सांगायचे आहे की साहेब राजीनामा घेण्याची घाई तुम्ही केली. तुम्ही आता जे सांगता की पुढे काय होणार. ते राजकारण होते. त्यावेळी तर तसे काही नव्हते ना असा सवाल छगन भुजबळांनी केला.

राज्यपाल होऊन गरीबांसाठी भांडू कसा?
यानंतर छगन भुजबळांना तुम्हाला राज्यपाल बनवण्यात येणार असल्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी फारच थेट भाषेत उत्तर दिले. राज्यपाल बनवणे म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. राज्यपाल होऊन मी काय करू. माझे काम आहे की मी गोरगरिबांसाठी भांडणे. राज्यपाल झाल्यानंतर मी गोरगरिबांसाठी भांडू शकणार आहे का, बोलू शकणार आहे का? असा सवाल छगन भुजबळांनी केला. मी जसा मोकळा आहे तसा ठीक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR