16.2 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रसांगलीतील जयंतराव यांची दुचाकीने अमरनाथ यात्रा

सांगलीतील जयंतराव यांची दुचाकीने अमरनाथ यात्रा

कसबे डिग्रज : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील जयवंतराव केदारराव चव्हाण वयाच्या पंचाहत्तरीतही गेली कित्येक वर्ष अमरनाथ यात्रेसाठी दुचाकीने जातात. दोन वर्षांपूर्वी त्यांचा एक व्हीडीओ व्हायरल झाला होता, या माध्यमातून ते प्रसिध्द झाले.

जयवंतराव केदारराव चव्हाण हे कसबे डिग्रजच्या हिम्मत बदल चव्हाण घराण्यातील आगळे वेगळे व्यक्तिमत्व. गावातील लोक त्यांना आबा म्हणतात. ते गेली कित्येक वर्ष पायी, सायकलवारी आणि सध्या मोटरसायकलने दक्षिण भारत, उत्तर भारत महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे फिरतीवर असतात. त्यांनी अमरनाथ यात्रा आतापर्यंत बारा वर्षे सायकलने आणि गेली १४ वर्षे दुचाकीने करीत आहेत. त्यांचे वय सध्या ७६ वर्षे आहे.

त्यामुळे त्यांचे हे धाडस, हा प्रवास, मोटारसायकल चालवणे, अनवाणी फिरणे आणि अंगावर फक्त लागणारी कपडे वापरणे हे खरोखरच अनेकांना अचंबित करणारे आहे. यावर्षी अमरनाथ यात्रेहून परतताना जम्मूतील एका पेट्रोल पंपावर युट्युबरने त्यांचा व्हीडीओ व्हायरल केला होता. या रिल्सला हजारो लाईक आणि कमेंट मिळत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR