23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रअंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद जाणार

अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद जाणार

मुंबई : शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्यापुढे निर्माण झालेल्या एकेक अडचणी वाढत चालल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवता आले असते, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांच्या पक्षातील नेते अंबादास दानवे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद मिळाले. परंतु आता दानवे यांचे हे पद धोक्यात आहे. कारण शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार आमशा पाडवी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहेत. आमशा पाडवी आता शिंदे गटात जात आहेत. त्यामुळे विधान परिषदेतील उद्धव ठाकरे गटाची संख्या एकाने कमी झाली. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ जास्त झाले आहे.

विधान परिषदेतील ठाकरे गटाचे संख्याबळ कमी होत आहे. सध्या ठाकरे गटाकडे ७ आमदार आहेत. तसेच त्यामधील ३ आमदारांचा कार्यकाळ जुन आणि जुलैमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांचे विरोधी पक्ष नेते पद धोक्यात आले आहे. सध्या काँग्रेसचे ८ आमदार आहेत. त्यापैकी २ आमदारांचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात संपत आहे.

विरोधी पक्षातील आमदार
ठाकरे – ७
काँग्रेस – ८
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – ३

जुलै नंतरचे संख्याबळ
ठाकरे गट – ४
काँग्रेस – ६
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – ३

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR