17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरअमित देशमुख यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी : थोरात

अमित देशमुख यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी : थोरात

लातूर : लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या अनुषंगाने पक्षाच्या वतीने विभागवार आढावा बैठका घेऊन २० ऑगस्ट रोजी मुंबई येथे विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यातील पहिली विभागीय आढावा बैठक दि. १० ऑगस्ट रोजी लातूर येथे झाली. बैठकीदरम्यान माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यावर आता फक्त लातूर जिल्ह्याची नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याची जबाबदारी आहे. राज्यातही त्यांना जावे लागेल, असे यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले.

थोरात पुढे म्हणाले की लोकसभेने महाराष्ट्रात काँग्रेसचा झंजावात निर्माण केला. विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसला मोठे यश मिळावे. लोकसभेच्या निवडणुकीत मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाने १०० टक्के यश मिळवले. त्यामुळे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यावर आता फक्त लातूर जिल्ह्याची नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याची जबाबदारी आहे. राज्यातही त्यांना जावे लागेल, असे यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले. ते पुढे म्हणाले, भाजपाला सत्तेचा अहंकार होता. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने त्यांचा अहंकार उतरवला. राज्यातील महायुतीचे सरकार भ्रष्टाचा-यांचे आहे. बहीण लाडकी नाही तर सत्ता लाडकी आहे. गेल्या सहा महिन्यांपासून निराधारांच्या पगारी झालेल्या नाहीत. अनेक अनुदाने रखडली आहेत. निधी अभावी अनेक विकास योजना थांबल्या आहेत. राज्याची विकास प्रक्रिया थांबली आहे. असे असताना केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे गुणगाण चालले आहे.

विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देताना बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेस पक्षाचे नेते विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कायम प्रेरणा मिळते. विलासरावजी आज आपल्यात नाहीत. परंतू, त्यांची आजवरची भाषणे काँग्रेसचा प्रचार करीत आहेत. दिलीपरावजी देशमुख यांच्या नेतृत्चाखाली अमित देशमुख व धिरज देशमुख यांनी लोकसभेत पक्षाला मोठे यश मिळवून दिले.

महायुती सरकार ही लुटारांची टोळी : वडेट्टीवार
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात महिला असुरक्षित आहेत, १५ हजार मुली, महिला बेपत्ता आहेत आणि मतासाठी नवीन योजना आणून दिशाभूल करत आहेत. महिलांना १५०० देऊन ३ हजाराचा खिसा कापतील, अशा सरकारपासून सावध रहा. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर होता. पण महायुती सरकारच्या काळात आता महाराष्ट्र मागे पडला असून गुजरात पुढे गेला आहे. राज्यातील महायुती सरकार ही लुटारांची टोळी आहे. भ्रष्टाचा-यांच्या हातात सरकारच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. तिजोरी साफ करणारे हे सरकार घालवा आणि काँग्रेसचा तिरंगा विधानसभेवर फडकवा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले

‘मविआ’ची सत्ता आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही : सतेज पाटील
काँग्रेसचे नेते सतेज पाटील म्हणाले की राज्यात महायुतीच्या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे खुप मोठे नुकसान झाले आहे. महायुतीच्या सत्ताधा-यांनी महाराष्ट्र लुटून खालला आहे. आता यांचे दिवस भरले आहेत. त्यामुळे राज्यात महाआघाडीची सत्ता आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे नमुद करुन सतेज पाटील पुढे म्हणाले, लोकसभेत १०० टक्के रिझल्ट देणारे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी अता आमदार निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी. ज्या भुमिने विलासराव देशमुख यांना राज्यभर फिरण्याची मुभा दिली तशी मुभा अमित देशमुख यांना लातूरच्या मतदारांनी द्यावी, असेआवाहनही त्यांनी केले.

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR