15.2 C
Latur
Wednesday, January 7, 2026
Homeमहाराष्ट्रअमरावतीचे बेलोरा विमानतळ एप्रिलपासून नाईट लँडिंग साठी सज्ज

अमरावतीचे बेलोरा विमानतळ एप्रिलपासून नाईट लँडिंग साठी सज्ज

अमरावती : बेलोरा विमानतळ एप्रिल २०२६ पासून नाईट लँडिंग साठी सज्ज असणार आहे. कोणती विमान कंपनी रात्रीला विमानांची सेवा देणार हे विमानतळ प्राधिकरण ठरविणार आहे. ३१ मार्चपर्यंत नाईट लँडिंग संबंधित एकूणच कामे पूर्णत्वास नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. हल्ली बेलोरा विमानतळ येथून ‘नाईट लैंडिंग’ सुविधा व्हावी, अशी अमरावतीकरांची मागणी यानिमित्ताने पूर्णत्वास जाणार आहे.

बेलोरा (अमरावती विमानतळ) येथे डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी डायरेक्शनल रेंज (डीव्हीओआर) यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक बांधकाम पूर्ण झाले असून डीजीसीएचे एक पथक दोन आठवडे आधी पाहणी करून परत गेले आहे. या चमुने सिव्हिल वर्कची पाहणी केली असता बेलोरा विमानतळ हे नाईट लँडिंग साठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले. येत्या आठवड्यात डीजीसीएचे अभियांत्रिकी तसेच तंत्रज्ञांचे पथक बेलोरा विमानतळावर दाखल होणार असून ते अँटेना तसेच आवश्यक यंत्रांची उभारणी करणार आहे.

ही यंत्रणा इन्स्टॉल होण्यासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागतो. यात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी वारंवार तपासणी व चाचणी घेतली जाते. तंत्रज्ञ चमूला ही यंत्रणा पूर्णपणे इन्स्टॉल झाल्याची खात्री पटते, त्यानंतर तिची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. यंत्रणा व्यवस्थित असून ती अस्तित्वात आल्याचा परवाना हा डीजीसीएकडून घ्यावा लागतो. त्यामुळे डीजीसीएचे विशेष पथक यंत्रणेच्या अचूकतेची चाचणी घेईल. त्यांची पूर्ण खात्री झाल्यानंतरच परवाना मिळतो. त्यानंतरच रात्री विमानोड्डाण व लँडिंग सुरू होते. ही संपूर्ण प्रक्रिया दोन ते अडीच महिने चालणार आहे.

त्यानंतरच एप्रिलपासून रात्री विमानांचे लैंडिंग व टेकऑफ होईल, अशी माहिती आहे.
एप्रिलपासून विमानतळ नाईट लँडिंग साठी सज्ज असेल, अशी सुविधा तयारी केली जाणार आहे. बांधकाम अंतिम टप्प्यात असून महिन्याभरात पूर्ण होईल. मात्र नाईट लँडिंग साठी लागणारा परवाना, तांत्रिक बाबी हे विमानतळ प्राधिकरण हाताळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR