26.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्र८ वर्षांच्या बालकाला जीबीएसचा आजार

८ वर्षांच्या बालकाला जीबीएसचा आजार

जळगाव जामोद : तालुक्यातील ग्राम खेर्डा बुद्रूक येथील एका साडेआठ वर्षीय बालकाला जीबीएस नावाचा आजार असल्याचे वैद्यकीय तपासणीमध्ये आढळून आले आहे. या बालकावर सध्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रमध्ये जीबीएस नावाच्या आजाराने सध्या भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यातच खेर्ड्यासारख्या कमी लोकवस्तीच्या गावामध्ये म्हणजे ग्रामीण भागातही आता जीबीएसचा रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर, जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बालकाला पंधरा दिवसांपूर्वीच हातापायात अशक्तपणाचा त्रास सुरू होता.

त्यांनी स्थानिक ठिकाणी उपचार घेतले व त्यानंतर जळगाव जामोद, खामगाव येथील उपचारानंतर त्यांनी अकोला येथे खासगी दवाखान्यात उपचार घेतले. त्या ठिकाणीच संबंधित बालकाला वैद्यकीय तपासणी आणि रक्त तपासणी मध्ये १३ फेब्रुवारी रोजी जीबीएस नावाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. अशा आजारावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार करणे अतिशय महागड्या स्वरूपाचे असल्याने त्यांनी तत्काळ अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या बालकाला दाखल केले.

शासकीय योजनेतून उपचार
शासकीय योजनेतून बालकावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. या आजारामध्ये हात पायामध्ये कमजोरी येऊन चालणे, बसणे अवघड होऊन जाते. तसेच मेंदूपासून हातापायापर्यंत येणा-या नसांची हालचाल ही कमी होते. त्यामुळे हाता पायामध्ये कमजोरी येते. हा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. म्हणजेच या आजारामध्ये स्वत:ची रोगप्रतिकारशक्ती स्वत:च्याच मज्जातंतूंवर हल्ला करते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR