22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयस्फोटकांच्या कारखान्यात स्फोट; १२ जण दगावले

स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट; १२ जण दगावले

नवी दिल्ली- छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यातील एका स्फोटकांच्या फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बेरलामधील पिरडा गावात हा स्फोट झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. माहिती मिळताच, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. सध्याच्या माहितीनुसार, सहाजण जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दोनच दिवसांपूर्वी डोंबिवली येथे एका केमिकलच्या कंपनीत स्फोट झाला होता. यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यातच आता ही छत्तीसगडमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटावेळी अनेकजण परिसरात उपस्थित होते असे सांगितले जाते.

स्फोटकांच्या कारखान्यामध्ये स्फोट झाला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी आल्या आहेत. स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्फोट इतका मोठा होता की किलोमीटरपर्यंत हादरा बसला होता. दरम्यान, आतापर्यंत एकाही मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR