बार्शी : संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमधील अमरण उपोषण नव्या दिवशी स्थगित झाल्यामुळे बार्शी येथे आनंद काशीद यांनी देखील ९ व्या दिवशी उपोषण स्थगित केले.
अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे जरांगे पाटील यांनी मागील एक वर्षापासून आमरण उपोषण, सातत्याने आंदोलन केली त्याला मराठा समाजाने राज्यभरातून भरभरून प्रतिसाद दिला असताना सरकार मात्र मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही ही मात्र खरी खंत मराठा समाजाच्या मनात असल्यामुळे येणाऱ्या विधानसभेला मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेदेखील आनंद काशीद यांनी उपोषण सोडताना सांगितले.
इथून पुढच्या काळातदेखील मनोज जरांगे पाटलांचा आदेश म्हणून मी काम करेल आणि बार्शी तालुक्यात आघाडीवर राहील यामध्ये कुठलीही शंका नसल्याचे आनंद काशीद यांनी सांगितले. उपोषण सोडण्यासाठी बार्शी तहसीलचे नायब तहसीलदार सुभाष बदे, बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, माजी नगराध्यक्ष विश्वास (भाऊ) बारबोले, माजी पंचायत समितीचे सभापती युवराज (बापू) काटे, माजी पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण (बापू) संकपाळ, माजी उपनगराध्यक्ष राहुल (भैया) कोंढारे यांच्यासह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने होते यावेळी विनायक मामा घोडके, विजय अण्णा साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. यासोबतच समाजबांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.