27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयअनंत अंबानी यांची प्री-वेडिंग

अनंत अंबानी यांची प्री-वेडिंग

जगभरातून दिग्गज, बॉलिवूड सेलिब्रिटीज, अब्जाधीश होणार सहभागी

अहमदाबाद : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी यांचा लग्नापूर्वीचा समारंभ गुजरातमधील जामनगरमध्ये होत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वी १ ते ३ मार्च दरम्यान प्री-वेंडिग समारंभ आयोजित केला आहे. जागतिक पातळीवरील प्रभावशाली नेते, अब्जाधीश, बॉलिवूडमधील स्टार आणि अनेक खेळाडू या समारंभास असणार आहेत.

आंतरराष्ट्रीय सुपरस्टार रिहाना आपल्या हिट गाण्यांचे प्रदर्शन यावेळी करणार आहे. तसेच सोलफुल सिंगर अरिजित सिंह, प्रतिभाशाली दिलजीत दोसांझ, संगीतकार जोडी अजय-अतुल आणि दिग्गज जादूगर डेव्हिड ब्लेन हे यामध्ये असणार आहेत. लग्न समारंभात सहभागी होणा-या विदेशी पाहुण्यांची यादी यावेळी मोठी असणार आहे. अंबानी परिवाराचा जागतिक प्रभाव या समारंभातून दिसणार आहे. लग्न १२ जुलै रोजी मुंबईत होणार आहे.

क्रिकेट खेळाडू आणि बॉलिवूड सेलिब्रिटी
सचिन तेंडुलकर, एम. एस. धोनी, रोहित शर्मा, के. एल. राहुल, हार्दिक पांड्या, ईशान किशन यासारखे दिग्गज खेळाडू लग्नास येणार आहेत. बॉलिवूडमधून अमिताभ बच्चन, रजनीकांत, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, शाहरूख, आमिर खान, सलमान खान, सैफ अली खान असणार आहेत. तसेच माधुरी दीक्षित कार्यक्रमास येणार आहे. अभिषेक-ऐश्वर्या, अजय देवगण-काजोल, रणवीर-दीपिका, रणबीर-आलिया आणि विक्की-कॅटरीना कार्यक्रमास येणार आहेत.

लग्नाच्या यादीत आहेत ही नावे
अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगला जागतिक दिग्गज येणार आहेत. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प येणार आहेत. अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, वॉल्ट डिज्नीचे सीईओ बॉब इगर, ब्लॅकरॉकचे अध्यक्ष लॅरी फिंक, ब्लॅकस्टोनचे संस्थापक स्टीफन श्वार्जमॅन, मॅक्सिकन व्यवसायी मॅग्नेट कार्लोस स्लिम, सऊदी अमिरातमधील रामकोचे अध्यक्ष यासिर अल रुमैयान, मॉर्गन स्टेनलीचे सीईओ टेड पिक, बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष अजित जैन, एडोबचे सीईओ शांतनू नारायण, भूतानचे राजा आणि त्यांची पत्नी, कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जसिम अल थानी आणि डब्ल्यूइएफचे अध्यक्ष क्लॉस श्वाब येणार आहेत.

भारतातील उद्योगपती असणार
टाटा समूहाचे एन चंद्रशेखरन, कुमार मंगलम बिर्ला आणि त्यांचा परिवार येणार आहे. गौतम अदानी आणि त्यांचा परिवार, गोदरेज परिवार, नंदन नीलेकणी, संजीव गोयंका, ऋषद प्रेमजी, उदय कोटक, अदर पूनावाला, सुनील मित्तल, पवन मुंजाल, रोशनी नादर, निखिल कामथ, रोनी स्क्रूवाला आणि दिलीप संघवी पोहोचणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR