29.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeलातूरअन् विधानसभा निवडणुकीत भाजपने मार्ग बदलला!

अन् विधानसभा निवडणुकीत भाजपने मार्ग बदलला!

लातूर : निवडणूक डेस्क
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मार्ग पूर्णपणे बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देवघर येथील सभेतील भाषण विचारात घेता ही बाब लक्षात येईल. ‘अटॅक इज द बेस्ट डिफेन्स’ असे म्हटले जाते. पंतप्रधान मोदी सध्या त्याचाच वापर करत आहेत.
आरक्षणावर भाजप आक्रमक
आरक्षणाचा मुद्दा विरोधकांनी जोर लावून धरला आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. या निकालातून भाजपने धडा घेतला. ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि काँग्रेसने भाजपच्या विरोधात प्रचार केला. राहुल गांधी यांनी थेट हल्लाबोल केला. हेतूंवर प्रश्न उपस्थित केला. आरक्षण संपवणे हा त्यांचा एकमेव उद्देश असल्याचे म्हटले. त्यानंतर आता भाजप देखील आक्रमक झालेली पाहायला मिळते.

प्रक्षोभक नारेबाजीला आवर
एकीकडे योगी आदित्यनाथ ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देत इशारा देत आहेत, तर नरेंद्र मोदी ‘एक है तो सेफ है’चा नारा देत आहेत. या नारेबाजीला देखील अजित पवार, पंकजा मुंडे आणि आता अशोक चव्हाण यांनीही विरोध केला आणि महाराष्ट्रातील लोक हे स्विकारणार नाहीत असे पंतप्रधान मोदींनाही समजावून सांगितले. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हे नारे ऐकायला मिळणार नाहीत, असे दिसते.

लोकसभेवेळच्या चुका टाळल्या
लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांमधून भाजपने धडा घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला असताना आरक्षणाबाबत अमित शहा यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत होता. व्हिडीओ पाहून अमित शाह आरक्षण रद्द करणार असल्याचा दावा करत असल्याचे दिसत होते. जात जनगणनेच्या मुद्द्यावर आक्रमक होत विरोधकांनी जर भाजप सत्तेवर आली तर राज्यघटना धोक्यात येईल, असा प्रचार सुरु केला. कदाचित अतिआत्मविश्वासाने भाजपने विरोधकांचे हे बोलणे हलक्यात घेतले. मात्र, नंतर एडिटेड व्हिडिओबाबत पक्षाने गुन्हा दाखल केला, काहींवर कारवाईही झाली पण तोपर्यंत उशीर झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR