22.9 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeमहाराष्ट्रअंगणवाडी सेविकांनी नागपुरात चौकातच भरवली अंगणवाडी

अंगणवाडी सेविकांनी नागपुरात चौकातच भरवली अंगणवाडी

नागपूर : गेल्या ५१ दिवसांपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे. अंगणवाडी कर्मचा-यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करा, अंगणवाडी सेविकांना वेतनश्रेणी, भविष्यनिर्वाह निधी लागू करा, अंगणवाडी सेविकांना २६ हजार रूपये मानधन देण्याच्या मागणीसह राज्यभरात अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाचं हत्यार उपसले आहे.

नागपूरातील अंगणवाडी सेविकांनी आज चक्क संविधान चौकात लहान मुलांसह अंगणवाडी भरवली आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी गेल्या ५१ दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरु आहे. आज नागपूरातील संविधानात चौकात अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीतील मुलांना घेऊन आंदोलन केले. २६ हजार रूपये वेतन लागू करा. यासह सोबत ग्रॅज्युटी लागू करा, पेन्शन लागू करा, या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR