25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रअनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे

अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे

सचिन वाझेंचे गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी
अनिल देशमुख खंडणी वसुली प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझेंनी केला होता. एवढेच नाही तर वाझेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे वक्तव्य वाझेंनी केले आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. देवेंद्र फडणवीसांवर अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी अतिशय गंभीर आरोप केले होते.

सचिन वाझे म्हणाले, सगळे पुरावे आहेत. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत. पीएच्या माध्यमातून ते पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे. मी सगळे पुरावे दिले आहेत. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचे नाव लिहिले आहे.

सचिन वाझे हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावर सध्या मनसुख हिरेन हत्याकांड आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सध्या ते तुरुंगात आहेत.

सत्तांतर झाले त्यानंतर अनिल देशमुखांवर वसुलीचे आरोप करण्यात आले. परमबीर सिंग यांनी देखील गंभीर आरोप केले होते. आता त्याची पुष्टी सचिन वाझेंनी केली आहे. सचिन वाझे हे त्यावेळी वारंवार बंगल्यावर जात होते. त्यावेळी ते पीएच्या संपर्कात होते. आता सचिन वाझेंनी समोर येऊन देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे हे स्पष्ट केले आहे. आरोपच नाही केले तर देवेंद्र फडणवीसांना देखील त्यांनी या संदर्भातील पत्र लिहित पुरावे दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुखांचा बुरखा फाटला
चित्रा वाघ
सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिले आहे. तसेच सचिन वाझेविषयी बोलताना उद्धव ठाकरेंनी भर सभागृहात त्यांची पाठराखण केली होती. आज पुण्यात उद्धव ठाकरे यावर बोलतील का? महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गँगची अधिक माहिती देतील का ? याची आम्ही वाट पाहतोय असे म्हणत टीकास्त्र सोडले आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR