22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमनोरंजनअंकुश-दीपाकडून गरजुंना अन्नदान

अंकुश-दीपाकडून गरजुंना अन्नदान

मुंबई : अंकुश चौधरी आणि दीपा परब ही मराठीतली ऑलटाईम हिट जोडी आहे. आपल्या अभिनयाने महाराष्ट्राला वेड लावणा-या अंकुश चौधरीचा ३१ जानेवारी रोजी वाढदिवस झाला. विशेष म्हणजे अंकुशचा वाढदिवस असण्याबरोबरच याच दिवशी अंकुश आणि दीपा यांच्या लग्नाचाही वाढदिवस असतो. या लोकप्रिय जोडीने गरजूंना अन्नदान करत यंदाचा वाढदिवस साजरा केला आहे.

सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर तन्मय पाटेकरने सोशल मीडियावर एक खास व्हीडीओ शेअर केला आहे. ज्यात अभिनेता अंकुश व दीपा चौधरी यांच्या अनोख्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची खास झलक पाहायला मिळत आहे. अंकुश व दीपा यांनी स्वत:च्या हाताने गरिबांना अन्नदान केले. तसेच दोघांनी एक छोटा केकही कापल्याचे व्हीडीओमध्ये दिसत आहे. वाढदिवशी मोठमोठ्या पार्टी न करत गरिबांना अन्नदान केल्याने दीपा आणि अंकुशचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.

तन्मय पाटेकर व्हीडीओच्या कॅप्शनमध्ये लिहले, आज अंकुश चौधरी आणि दीपा परब ह्यांनी अन्नदान करून आपला वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस आमच्यासोबत साजरा केला. हा योगायोग स्वामींनी जुळवून आणला असे बोलायला हरकत नाही. आदरणीय मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित अभिनेता व अभिनेत्रीचे मनापासून आभार. हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर चाहत्यांनीही अंकुशला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या. तसेच अनेकांनी श्री स्वामी समर्थ अशा कमेंट केल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR