27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रधीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात अंनिस आक्रमक

धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात अंनिस आक्रमक

गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अंनिसतर्फे करण्यात आली. त्यासंदर्भात त्यांनी पोलिसांना निवेदनदेखील दिले आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा पुण्यातील संगमवाडी परिसरातील तीन दिवसीय सत्संग आणि दरबार आयोजित केला होता. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाबा , दिशाभूल, फसवणूक करणारे आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी वक्तव्ये, भाष्य, कृत्य धीरेंद्र शास्त्री सतत करत असून त्याची पुनरावृत्ती पुण्यात देखील झाली आहे, असा आरोप महाराष्ट्र अंनिसने केला आहे. महाराष्ट्र अंनिसने मागण्यांचे निवेदन पोलिस प्रशासनाला दिले आहे. वर्दीवर असणारे पोलिस अधिकारी हे धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात जाऊन शास्त्रींपुढे नतमस्तक झाले.

त्यांनी अशास्त्रीय पद्धतीने समस्यांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे दरबारात जाणे हे महाराष्ट्र सेवा अधिनियम व तत्सम कायद्यांचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. धीरेंद्र शास्त्री हे लोकांच्या देव, धर्म, श्रद्धा, उपासना आणि भावना, अगतिकता, अज्ञान यांचा गैरफायदा घेऊन लोकांना देव, धर्म, श्रद्धा, उपासनेशी निगडित विसंगत, अशास्त्रीय, अवैज्ञानिक बाबी सांगत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी अंनिसची मागणी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR