चेन्नई : अभिनेता थलपती विजय हा सध्या त्याच्या राजकीय पक्ष आणि राजकीय प्रवेश याबाबत मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले. गेल्या काही दिवसांपासून विजयच्या राजकीय पक्षाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. अखेर विजयने त्याच्या राजकीय पक्षाचे नाव जाहीर करुन मोठा निर्णय घेतला आहे.
अभिनेत्यांचे राजकारणात येणं आणि भूमिका मांडणे हे काही नवीन नाही. यापूर्वी कित्येक बॉलीवूडमधील अभिनेत्यांनी राजकीय पक्षातून आपली भूमिका मांडली आहे. याला साऊथचे कलाकारही अपवाद नाहीत. त्यांच्याकडे तर कलाकारांची राजकीय कारकीर्द भली मोठी आहे. अशात आणखी एका प्रसिद्ध साऊथच्या अभिनेत्याने त्याच्या राजकीय पक्षाची घोषणा करुन चाहत्यांना धक्का दिला आहे.
विजयच्या राजकीय पक्षाचे नाव तमिळगा वेत्री काझीम असे असणार आहे. या पक्षाच्या माध्यमातून विजय राजकारणातून सर्वसामान्य लोकांची भूमिका मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.