नांदेड : लोकसभा निवडणुकीत माजी खा.प्रताप पाटील चिखलीकर हे पराभुत झाले पण हे पराभव त्यांना पचणी पडत नाही. स्वत: बिलोली येथील बैठकीत मनात असलेली खद-खद त्यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली. यानंतर त्यांना पक्षश्रेष्ठीने कानपिचक्या दिल्या होत्या. आता त्यांच्या जाागी त्यांचे कार्यकर्ते बईमानी करणा-यांंचा बदला घेण्याची एकही संधी सोडत नसल्याची अनुभूती नांदेड येथील एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमातून नांदेडकरांना पाहावयास मिळाली.
नांदेड लोकसभा निवडणुकीतील माजी खा. प्रताप पाटील चिखलीकर हे पराभूत झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटी घाठी घेणे व त्यांचे आभार मानने असा कार्यक्रम सुरू केला. पण पहिल्याच कार्यक्रमात त्यांनी मनात असलेली खद-खद कार्यकर्त्यांसमोर जाहीर व्यासपीठावर व्यक्त केली. पण याची वाचता संपुर्ण देशभर झाली. आयोजित केलेला कार्यक्रम रद्द करून पक्ष श्रेष्ठीने त्यांना मुंबई येथे बोलावून घेतले. तुम्ही जे काही वक्तव्य करत आहात ते आपल्या भारतीय जनता पार्टी या पक्षाला शोभणारे नाही. अशा कानपिचक्या मुंबईत पक्ष श्रेष्ठीने दिल्याचे त्यांच्याच कार्यकर्त्याने सांगितले. पण नाटकाचा एक भाग संपल्यानंतर दुसरा भाग सुरु झाला.
हा दुसरा भाग आता कार्यकर्त्यांनी हाती घेतला. नांदेड शहरातील ताज पाटील या हॉटेलमध्ये नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर विधानसभा महायुतीच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्वत: माजी खा. प्रताप पाटील चिखलीकर, आ. बालाजी कल्याणकर, भाजपा माजी नगराध्यक्ष प्रविण साले, उत्तर विधानसभा प्रमुख मिलिंद देशमुख, माजी विरोधी पक्ष नेता दिपकसिंह रावत, राष्ट्रवादी कॉंगे्रसचे शहराध्यक्ष जीवन पाटील घोगरे, चेतन्य बापू देशमुख, व्यंकटराव कवळे गुरूजी यांच्यासह अनेक जण व्यासपीठावर बसून होते. महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते हे मनोगतासाठी माईकसमोर उभे राहिला असता बालाजी पुयड या भाजपा कार्यकर्त्याने तुम्हाला बोलण्याचा अधिकार काय आहे? तुम्ही महानगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्या असे म्हणत कंदकुर्ते यांच्याकडे हात वारे करत मोठ-मोठ्याने बोलत होते. हा सर्व प्रकार माजी खा. प्रताप पाटील चिखलीकर हे डोळे भरून पाहत होते.
केवळ सोपस्कार पुर्ण करण्यासाठी म्हणून त्यांनी जागेवर बसूनच हातवारे करून खाली बसण्यास सांगितले. यावेळी महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी तुम्हाला खुप अधिकार आहे बसा काय केल काय नाही हे माहित आहे. अरे बसा हो मी काय केल ते पक्ष बघून घेईल असे कंदकुर्ते बोलत होते. यावेळी पुयड यांनी याला बोलायचा अधिकार काय अधिकार आहे म्हणते होते. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना खाली बसविण्याचा प्रयत्न करत होते. पण मी खाली बसणार नाही याला बोलायचा काय अधिकार आहे असे म्हणणे पुयड यांचे चालूच होते. हा सर्व प्रकार माजी खा. चिखलीकर मात्र खाली मान घालून उघड्या डोळ्याने आणि उघड्या कानाने बघत होते. याची चर्चा मात्र वा-यासारखी संपुर्ण जिल्ह्यात वेगाने पसरली. एकंदरीत चिखलीकर यांनी जे काही कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलले होते. त्याची सुरुवात आता कार्यकर्त्याच्या माध्यमातनून सुरू झाली. हे चित्र आता नांदेडकरांना स्पष्टपणे दिसत आहे. यातून एक मात्र नक्की स्पष्ट होते. अशा कार्यकर्त्यांना माजी खासदार चिखलीकर खतपाणी घात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.