25.9 C
Latur
Tuesday, March 11, 2025
Homeमहाराष्ट्रमुंगी साखर खाते, मनसे सुपारी!

मुंगी साखर खाते, मनसे सुपारी!

मुंबई : महाराष्ट्रात काही पक्ष आहेत, त्यांचे मुख्य खाद्य सुपारी आहे. ते सुपारीवर जगणारे पक्ष आहेत. मुंगी साखर खाते, झुरळ वेगळं काहीतरी खाते, वाघ अजून काही तरी खातो. राजकारणात असे काही पक्ष आहेत, त्यांचं मुख्य अन्न सुपारी आहे. आता सुपारीवर जगणा-या लोकांनी महाराष्ट्रात शिवसेनेचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्राच्या शत्रुंशी हातमिळवणी केली असेल, तर ते या राज्याच दुर्देव आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

शेकाप मविआमध्ये आहे. शेकापला ज्या जागा हव्या, त्या शिवसेनेकडे आहेत. शेकापची ताकद कोकणात विशेषकरुन रायगडमध्ये आहे. त्या जागा आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत. अलिबाग, सांगोला या शिवसेनेच्या जिंकलेल्या जागा आहेत, असं खासदार संजय राऊत म्हणाले. लोकसभेला ठाणे, कल्याणमधील पराभवावर संजय राऊत म्हणाले की, पराभव लादला गेला. यंत्रणांचा वापर करुन दुबार मतदान अशा अनेक गोष्टींचा वापर करुन ठाण्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. यावेळी अधिक जागरुक आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR