28.7 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यभरात भाजपविरोधी लाट

राज्यभरात भाजपविरोधी लाट

तासगाव : राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एकूणच, राज्यभरात मतदारांमध्ये भाजपविरोधी लाट असल्याचे चित्र दिसले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) स्टार प्रचारक रोहित पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले. सांगलीतही तेच चित्र असेल, असेही ते म्हणाले.

आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीत या वेळी घेतले होते. वर्धा, दिंडोरी, शिरूर, बारामती, माढा, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, नाशिक या मतदारसंघांत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या.

प्रचारासाठी फिरताना आलेल्या अनुभवाबद्दल रोहित पाटील म्हणाले, मतदारांमध्ये भाजपविरोधी लाट असल्याचे जाणवले. महागाई, बेरोजगारी, उद्योगधंदे, नोक-या यांबाबत मतदार बोलत होते. महाविकास आघाडीने या मुद्यांना प्राधान्य दिले असल्याने मतदार महाविकास आघाडीच्या मागे उभे असल्याचे चित्र सर्वत्र दिसले. राज्यात भाजपविरोधी लाट जाणवत होती. तसेच सांगलीमध्ये वातावरण असेल, असे मिश्कीलपणे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR