गडचिरोली : तीन राज्यांच्या सीमेवर करेगट्टा पहाडावर गेल्या १८ दिवसांपासून सुरू असलेले देशातील सर्वांत मोठा माओवाद विरोधी अभियान आता ६ महिन्यांसाठी थांबवण्यात आले आहे. २६ माओवाद्यांना या अभियानात कंठस्रान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले. विशेष म्हणजे सरकार आत्मसमर्पणावर ठाम आहे.
तीन राज्यांच्या सीमेवर महाराष्ट्राच्या सीमेपासून ५० किलोमीटर अंतरावर करेगुट्टाचे मोठे पहाड आहे. १० हजार फूट किलोमीटर उंच असलेले करेगुट्टाच्या पहाडाला लागून अबूझमाड आणि इंद्रावती नॅशनल पार्क या दोन माओवाद्यांचेबलस्थानात अलीकडेच सुरक्षा दलांनी प्रवेश करून कॅम्प उभारल्याने काही वर्षापासून माओवाद्यांनी करेगुट्टा लगत असलेल्या परिसरात आपले वास्तव्याचे ठिकाण बनवले होते.
या ठिकाणी माओवाद्यांनी एका महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात आयइडीची स्फोटके पेरून ठेवली असल्यामुळे गावक-यांनी या भागात येऊ नये असे पत्र काढले होते. मोठ्या प्रमाणात माओवादी या ठिकाणी वास्तव्याला असल्यानेच माओवाद्यांनी हे पत्र काढल्याचे सुरक्षा दलांच्या लक्षात आले त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार देशातला सगळ्यात मोठे माओवाद विरोधी अभियान या ठिकाणी राबवण्याचा निर्णय छत्तीसगडच्या सुरक्षा दलाने घेतला.
यात छत्तीसगड पोलिस डीआरजी यांच्यासह सीआरपीएफ कोब्रा बटालियनचे कमांडो मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या जवानांची संख्या २९ हजारांच्या जवळपास होती तर या अभियानात पहिल्यांदाच एमआय १७ या वायूदलाच्या हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. तसेच या अभियानात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या ड्रोनचा वापरही करून माओवाद्यांची रेकी करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले.
जवानांनी या पहाडाला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले. पहिल्याच दिवशी झालेल्या चकमकीत चार माओवादी ठार झाले होते. दरम्यान गेल्या १६ दिवसांत माओवाद्यांनी पेरून ठेवलेली अडीचशे पेक्षा जास्त आयडीची स्फोटके सुरक्षा दलाने त्याच ठिकाणी निष्क्रिय केली. या दरम्यान दोन जवानांसह तीन सुरक्षा दलाचे या ठिकाणी आयईडीच्या स्फोटात जखमी झाले. तर माओवाद्यांच्या वास्तव्यासाठी असलेली मोठी गुफा ही जवानांनी शोधून काढली होती. दोन दिवसांपूर्वी अभियानाच्या १५ व्या दिवशी जवान आणि माओवादी यांच्यात मोठी चकमक झाली आणि तब्बल २२ माओवाद्यांना कंठस्रान घालण्यात यश आला आहे.
या पहाडावर माओवाद्यांची सर्वात मोठी आक्रमक असलेल्या बटालियनचे नेते हिडमा, देवा तेलंगाणा समितीचा प्रभारी दामोदर यांच्यासह दंडकारण्य झोनल समितीचे नेते आणि हजारच्या जवळपास माओवादी उपस्थित असल्याची सुरक्षा दलांकडे विश्वासनीय माहिती होती. त्यातूनच हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले होते. या अभियानावर केंद्रीय गृह मंत्रालयासह देशातल्या सगळ्या वरिष्ठ सुरक्षा एजन्सीची नजर होती.
९ मेपासून आदेश जारी
जवानांनी त्या काळात नीलम शराय आणि धोबी पहाड हे दोन पहाड आपल्या ताब्यात घेतले होते. त्यानंतर करेगटाच्या दिशेने जवानांची आगे कूच सुरू होते. आज १८ वा दिवस असताना ९ मे रोजी संध्याकाळपासूनच जवानांना परत येण्याचे निर्देश देण्यात आले.
भविष्यात मोठे अभियान सुरु होणार
भारत-पाक सीमेवर ज्या पद्धतीने थुमचक्री सुरू आहे. ते पाहता सरकारने बा सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सुरक्षा दलांना माघारी येण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती एका वरिष्ठ उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. सीआरपीएफ आणि इतर निमलष्करी दलाचे जवान मुख्यालय परतण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या माओवाद्यांच्या विरोधातले हे अभियान थांबले असले तरी भविष्यात परत एकदा हे मोठा अभियान सुरू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.