पुणे : प्रतिनिधी
अंत्योदय रेशन कार्डधारक असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते. यंदाही अंत्योदय रेशन कार्डधारक असलेल्या लाभार्थी महिलांना साड्यांचे वाटप केले जाणार आहे. होळीपर्यंत या साड्यांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकीकडे महिलांना साडी मिळणार असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे या योजनेवरून पुणे जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
दरम्यान, अंत्योदय रेशन कार्डधारक असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते. एकीकडे महिलांना साडी मिळणार असल्याची चर्चा आहे तर, दुसरीकडे या योजनेवरून पुणे जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारण पुणे जिल्ह्यातील ४८ हजार ८७४ महिलांना साड्या देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वांत जास्त ७ हजार ९७५ साड्या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार आहेत.
राज्य सरकारने अंत्योदय रेशन कार्डधारकांना अन्नधान्यासोबत एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या योजनेच्या लाभार्थी महिलांची माहिती घेतली असता, पुणे जिल्ह्यात जास्त अंत्योदय कार्डधारक असल्याची माहिती समोर आली आहे.
४८ हजार ८७४ शिधापत्रिकाधारकांना लाभ
या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार ८७४ शिधापत्रिकाधारकांना अर्थात महिलांना याचा लाभ होणार आहे. सरकारने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी या साड्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा सणासुदीचा क्षण आनंदाचा आणि उत्साहाचा होणार आहे.