21.5 C
Latur
Friday, August 29, 2025
Homeमनोरंजनअनुपम खेर यांना स्व. राज कपुर जीवनगौरव पुरस्कार

अनुपम खेर यांना स्व. राज कपुर जीवनगौरव पुरस्कार

बई : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर नामांकित राज कपूर कपूर, व्ही शांताराम, जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान केले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. यावेळी अभिनेते अनुपम खेर यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अनुपम खेर गेली अनेक वर्ष हिंदी, साउथ सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. इतकेच नव्हे हॉलिवूडमध्येही अनुपम खेर यांनी काम केले आहे. आज ६० आणि ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनुपम खेर यांना स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, उद्योगमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हा खास पुरस्कार देण्यात आला.

यावेळी जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर अनुपम खेर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. अभिनेते म्हणाले मी ३ जून १९८१ साली मुंबईत आलो. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा मी गोल्ड मेडलिस्ट होतो. मी ज्या नोकरीच्या शोधात आलो होतो तिथे नोकरी नव्हतीच. मला धोका मिळाला. त्यावेळी चाळीच्या एका छोट्या रुममध्ये राहत होतो. मला त्या चाळीचा पत्ताही माहित नव्हता. त्यावेळी टॅलेंटपेक्षा हेअरस्टाईलला महत्व असायचे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR