18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयसंदीप घोषच्या पॉलिग्राफी चाचणीला मान्यता

संदीप घोषच्या पॉलिग्राफी चाचणीला मान्यता

कोलकाता बलात्कार प्रकरणाचा खुलासा होणार फक्त ४ डॉक्टरांची चाचणी होणार

कोलकाता : येथील महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली असून सीबीआयने गेल्या काही दिवसापासून तपास सुरू केला आहे. सीबीआयने आरजी कर कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना गुरुवारी सियालदह न्यायालयात हजर केले होते, त्यानंतर न्यायालयाने आता संदीप घोषच्या पॉलिग्राफी चाचणीला मान्यता दिली आहे. याशिवाय चार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची पॉलिग्राफी चाचणीही केली जाणार आहे.

८-९ ऑगस्टच्या रात्री घडलेल्या कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही. या कारणास्तव सीबीआयला संजय रॉय, संदीप घोष आणि त्या चार डॉक्टरांची पॉलीग्राफ चाचणी करायची आहे, या घटनेच्या रात्री या डॉक्टरांनी महिला डॉक्टरसोबत रात्री जेवण केले होते. हे लोक चौकशीदरम्यान खरे बोलत नाहीत किंवा काहीतरी लपवत आहेत, असा संशय सीबीआयला आहे.

गेल्या ७ दिवसांच्या चौकशीदरम्यान संदीप घोष याने दिलेली उत्तरावरुन सीबीआयला संशय आहे. ते चार डॉक्टर सीबीआयसाठी महत्त्वाचे आहेत कारण संजय रॉय यांच्याशिवाय त्यांनीच त्या रात्री पीडितेला जिवंत पाहिले होते. मुख्य आरोपीने आपला गुन्हा कबूल केला, पण मुख्य आरोपी संजय रॉय आणि त्याच्या उत्तरावर सीबीआयला संशय आहे. पॉलीग्राफ चाचणीद्वारे हत्येच्या रात्री काय झाले याची माहिती मिळू शकते. त्या रात्री त्या चौघांमध्ये काय बोलणे झाले याची माहिती मिळू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR