नवी दिल्ली : म्यानमार लष्कराच्या लढाऊ विमानांनी शुक्रवारी भारत-म्यानमार सीमेवरील अराकान लष्कराच्या तळावर बॉम्बहल्ला केला. आतापर्यंत ५० (कॅडर) जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. भारतीय हद्दीत या बॉम्बस्फोटाचा कोणताही परिणाम झालेला नाही. म्यानमार आर्मीच्या लढाऊ विमानांनी आणि हेलिकॉप्टरने म्यानमारच्या वारंग गावाजवळ असलेल्या अरकान आर्मी तळावर बॉम्बफेक केली. या घटनेत ४०-५० एए कॅडर मारले गेले आणि सुमारे ३० जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, वरंगचे सर्व गावकरी जंगलात पळून गेले आहेत. काही लोक भारतीय भागात घुसले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र आतापर्यंत कोणीही भारतीय हद्दीत घुसल्याचे
अधिकृत वृत्त नाही. म्यानमारचे वारंग हे गाव भारतातील दुमजाओ आणि हमवांगबुचुआ या गावांच्या जवळ आहे. त्यामुळे जवळच्या भारतीय गावांमध्ये म्यानमारच्या नागरिकांचा प्रवेश नाकारता येत नाही, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.