24.9 C
Latur
Thursday, July 10, 2025
Homeराष्ट्रीयलष्कराचे ‘ऑपरेशन सर्वशक्ती’ सुरू

लष्कराचे ‘ऑपरेशन सर्वशक्ती’ सुरू

जम्मू-काश्मीरसह राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये करवाई पाकचे मनसुबे उधळून लावू

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्याचे पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराने ऑपरेशन सर्वशक्ती सुरू केले आहे. यामध्ये भारतीय लष्कर पीर पंजाल पर्वतराजीच्या दोन्ही बाजूंनी कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करणार आहे.

अलीकडच्या काळात, पाकिस्तानच्या प्रॉक्सी दहशतवादी गटांनी पीर पंजाल रेंजच्या दक्षिणेला, विशेषत: राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये दहशतवादाला पुन्हा चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. दहशतवादी हल्ल्यात सुमारे २० भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. २१ डिसेंबर रोजी डेरा की गली या भागात ४ जवान शहीद झाले होते. जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ, स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि गुप्तचर संस्था परस्पर समन्वयाने काम करतील. प्रदेशातील गुप्तचर यंत्रणा मजबूत करण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. विशेषत: राजौरी पुंछ सेक्टरमध्ये दहशतवादी कारवायांना पुनरुज्जीवित करण्याचे पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले जातील. राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये आणखी सैन्य पाठवण्यात येत आहे.

सर्पविनाशच्या धर्तीवर होणार ऑपरेशन
सर्पविनाशाच्या धर्तीवर ही कारवाई अपेक्षित आहे. दहशतवादी कारवाया नष्ट करण्यासाठी २००३ मध्ये ऑपरेशन सर्पविनाश सुरू करण्यात आले होते. या काळात या भागातील दहशतवादी कारवाया जवळपास संपुष्टात आल्या होत्या. नुकतेच लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी उत्तर कमांडसह कॉर्पस कमांडर्ससोबत दहशतवादी धोक्याचा सामना करण्याच्या मार्गांवर चर्चा केली होती. सुरक्षा दलांनी एजन्सीला सांगितले की, ऑपरेशन सर्वशक्ति पीर पंजाल पर्वत रांगेच्या दोन्ही टोकांवरून होणार आहे. लष्कराचे मुख्यालय आणि लष्कराच्या उत्तरी कमांडच्या कडक देखरेखीखाली उधमपूरमध्ये ऑपरेशन सर्वशक्ती सुरू करण्यात येत आहे.

अमित शहा यांच्या भेटीनंतर प्लॅन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, लष्कर, गुप्तचर यंत्रणांचा समावेश असलेल्या सुरक्षा बैठकीनंतर लगेचच या कारवाईचे नियोजन करण्यात आले. उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाईसाठी लष्कराच्या उच्च अधिका-यांची बैठक घेतली होती.

डिसेंबरमध्ये ४ जवान शहीद, ३ जखमी
२१ डिसेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. यामध्ये ४ जवान शहीद झाले, तर ३ जवान जखमी झाले आहेत. ठाणेमंडी-सुरनकोट मार्गावरील डेरा की गली नावाच्या परिसरात हा हल्ला झाला. ही वाहने सैनिकांना घेऊन सुरणकोट आणि बाफलियाजकडे जात होती.

२५०-३०० दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात
१६ डिसेंबर रोजी बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिका-याने गुप्तचरांचा हवाला देत माहिती दिली होती की, २५० ते ३०० दहशतवादी पाकिस्तान सीमेवर लॉन्चपॅडवर आहेत. ते जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या अधिका-याने सांगितले की, सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. सीमेपलीकडून घुसखोरीचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR