मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वांत श्रेष्ठ असे संविधान दिले आहे. संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क दिले आहेत. आपल्या संविधानाबाबत जनजागरणासाठी संविधान दिनाचे औचित्य साधून काँग्रेसच्या वतीने राज्यभर संविधानाच्या एक लाख प्रतींचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
२६ नोव्हेंबरला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी ही माहिती दिली.
संविधान वितरण समारंभप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे समन्वयक के. राजू, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एससी विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोठिया, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत.
सीएसएमटी स्थानकाचे क्षेत्र
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विकासाचे एकूण क्षेत्रफळ ४,६१,५३४ चौरस मीटर असेल, ज्यापैकी नवीन बांधकाम २,७९,५०७ चौरस मीटर, नूतनीकरण क्षेत्र १,३०,९१२ चौरस मीटर आणि अभिसरण क्षेत्र ३७,७०३ चौरस मीटर असेल. यामध्ये आणि १३,४१२ चौरस मीटरची इतर लँडस्केपिंगची कामे असणार आहेत.