22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमुख्य बातम्याराज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार!

राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार!

निवडणूक आचार संहितेपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १७ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शनिवारी १७ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामध्ये सरकारने राज्य पोलिस दलामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार आहे. तसेच संस्कृत, तेलुगू आणि बंगाली साहित्य अकादमी स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोलकडे’ ही योजना राबविण्यात येणार आहे. तसेच संगणक गुन्हे तातडीने निकाली काढण्यासाठी सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार येणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
– राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी
– तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिका-यांना नियमित करणार
– मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला.
– १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.
– संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार
– शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण
– विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल.
– पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.
– हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’कडे योजना.
– संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार
– राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार
– ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान
– भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप
– संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार.
– वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन
– राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी अतिरिक्त निधी मंजूर

– श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR