22.6 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeउद्योगकृत्रिम उपग्रहांमुळे पृथ्वीला मोठा धोका, शास्त्रज्ञ चिंतेत

कृत्रिम उपग्रहांमुळे पृथ्वीला मोठा धोका, शास्त्रज्ञ चिंतेत

आइसलँड : कृत्रिम उपग्रहांमुळे पृथ्वीला मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शास्त्रज्ञ देखील चिंतेत आहेत. उपग्रह नेटवर्कच्या वेगात होत असलेल्या विस्तारामुळे नवीन चिंता निर्माण झाली आहे. मेगाकॉस्टलेशनसाठी आवश्यक असलेल्या उपग्रहांच्या वाढत्या संख्येमुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर अनपेक्षित परिणाम होऊ शकतात, असे सिएरा सॉल्टर, आइसलँड विद्यापीठाच्या अभ्यासात म्हटले आहे.

स्पेस एक्स, अमेझॉन, वन वेब सारख्या कंपन्या ग्रहाची लांबी आणि रुंदी व्यापून मोठ्या संख्येने उपग्रह नक्षत्र लॉन्च करत आहेत. याचे श्रेय स्पेस एक्सच्या स्टारलिंग प्रकल्पाला आणि जागतिक इंटरनेट कव्हरेज प्रदान करण्याच्या उद्देशाने इतर संस्थांच्या उपक्रमांना दिले जाते. हा विकास चांगल्या कनेक्टीव्हीटी बाबात आश्वस्त करतात. मात्र यामुळे पर्यावरणाचा देखील मोठा प्रश्न निर्माण होतो. यामध्ये प्रकाश प्रदूषण, निम्न-पृथ्वीच्या कक्षेत संभाव्य टक्कर आणि ओझोन थर प्रभावांसह महत्त्वपूर्ण पर्यावरणीय समस्या देखील निर्माण करतात.

सॉल्टरच्या अभ्यासानुसार एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. पृथ्वीची चुंबकीय ढाल कमकुवत होणे. डिऑर्बिटेड उपग्रह ढिगा-यांचे वस्तुमान मॅग्नेटोस्फियरमधील नैसर्गिक कणांपेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ, एकाच दुस-या पिढीच्या स्टारलिंक उपग्रहाचे अवशेष व्हॅन अ‍ॅलन बेल्ट्समधील कणांच्या एकत्रित वस्तुमानापेक्षा सात दशलक्ष पट जास्त वजनदार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR