24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात तब्बल २९ लाख कुणबी मराठा नोंदी

राज्यात तब्बल २९ लाख कुणबी मराठा नोंदी

विदर्भात सर्वाधिक तर मराठवाड्यात सर्वात कमी

मुंबई : राज्य सरकारने गेल्या १५ दिवसांत मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदी तपासल्या. त्यात पूर्वीही ज्यांना आरक्षणाचा लाभ होत होता त्यांचाही तपास करण्यात आला. राज्यात गेल्या १५ दिवसांत २९ लाख १ हजार १२१ नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यापासून कुणबी नोंदी तपासण्यास सुरूवात झाली. मात्र मराठवाड्या सर्वात कमी नोंदी आढळल्या आहेत.

तर सर्वाधिक नोंदी विदर्भात आढळल्या आहेत. मंत्रालयात आकडेवारी संकलनाचे काम सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात सापडलेल्या बहुतेक नोंदी नव्या आहेत. सांगलीत प्रमाणपत्र वाटपासाठी खास वेबसाईट, कार्यालय तयार करण्यात आले आहे.

आतापर्यंत सापडेल्या नोंदींमध्ये विदर्भात सर्वाधिक तर ज्या मराठवाड्यापासून कुणबी नोंदी तपासण्यास सुरूवात झाली. मात्र मराठवाड्या सर्वात कमी नोंदी आढळल्या आहेत. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून आठ कोटी ९९ लाख ३३ हजार २८१ नोंदींपैकी कुणबी- मराठा जातीच्या २९ लाख एक हजार १२१ नोंदी सापडल्या आहेत. सर्वात जास्त कुणबी नोंदी या विदर्भामध्ये सापडल्या आहेत. विदर्भात आतापर्यंत १३ लाख ३ हजार ८८५ नोंदी सापडल्या आहेत.

राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी कुणबी नोंदी या कोकणात सापडल्या आहेत. कोकणात जवळपास साडेपाच लाख नोंदी तपासल्याानंतर सर्वात कमी ११८ कुणबी-मराठा नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यातल्या सगळ्या नोंदी नव्याच आहेत. मंत्रालयात आकडेवारी संकलीत करण्याचे काम सुरू आहेत.

मागासवर्ग आयोगाने केवळ मराठा जातीचे सर्वेक्षण करावे : तायवाडे
ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मागासवर्ग आयोगाने नव्याने सर्वेक्षण करताना केवळ मराठा जातीचा अभ्यास करावा, ओबीसीत असलेल्या मराठा समुहातल्या सहा जातींचं सर्वेक्षण करू नये असे ते म्हणाले. मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करताना कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी या सहा जातीना वगळून मराठा समाज मागास आहे का याचा अभ्यास करावा असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR