22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयतब्बल ३०० अतिरेकी घुसखोरीच्या प्रयत्नात!

तब्बल ३०० अतिरेकी घुसखोरीच्या प्रयत्नात!

श्रीनगर : वृत्तसंस्था
पाकिस्तान सीमेवर २५० ते ३०० दहशतवादी लॉन्चपॅडवर आहेत. ते जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिका-याने गुप्तचरांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या अधिका-याने सांगितले की, सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. सीमेपलीकडून घुसखोरीचा कोणताही प्रयत्न केला तर सैनिकांकडून हाणून पाडला जाईल, असे सांगण्यात आले.

बीएसएफचे आयजी अशोक यादव यांनी पुलवामा येथे सांगितले की, दहशतवादी कारवाया पाहता आम्ही (बीएसएफ) आणि लष्कर संवेदनशील भागांवर लक्ष ठेवून आहोत आणि सतर्क आहोत. गेल्या काही वर्षांत सुरक्षा दल आणि काश्मीरमधील जनता यांच्यातील बॉन्डिंग वाढले आहेत. जनतेने सहकार्य केले तर विकासाची कामे अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकू. २४ तासांत जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोन चकमकी झाल्या, ज्यामध्ये ६ दहशतवादी मारले गेले. पहिली चकमक १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी कुलगाममध्ये सुरू झाली. यामध्ये पाच दहशतवादी मारले गेले. दुसरी चकमक राजौरी येथे झाली, ज्यामध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR