22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांची निवड

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांची निवड

कराची : पाकिस्तानात निवडणुकांचे निकाल जाहीर होऊनही अनेक दिवस सुरु असलेल्या राजकीय गोंधळानंतर अखेर नव्या पंतप्रधानांची घोषणा करण्यात आली. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे.

नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष सरदार अयाझ सादिक यांनी यासंदर्भात घोषणा केली. पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांना २०१ मते मिळविल्यानंतर पाकिस्तानचे २४ वे पंतप्रधान म्हणून निवडले आहे. पाकिस्तानची जनता या निकालाची बराच वेळ वाट पाहात होती. नवाझ शरीफ यांनी स्वत: पंतप्रधान न होता आपल्या बंधूंना सत्तेचे सोपान सोपविल्याने आता पाकिस्तानची राजकीय अस्थिरता संपुष्ठात येईल असे म्हटले जात आहे.

८ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणूकांत नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनला पुरेसे बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वत: पंतप्रधान पदाच्या शर्यतीत न उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे बंधू आणि पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज यांना पंतप्रधान बनविण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना धक्का बसला होता. अखेर इतर पक्षांची मदत घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला. शाहबाज यांना २०१ तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमर अयुब खान यांना ९० मते मिळाली.

अशी झाली निवड
पीएमएल-एन आणि पाकिस्तान पिपुल्स (पीपीपी) पार्टीचे संयुक्त उमेदवार शहाबाज यांनी शनिवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. पाकिस्तानी तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) पार्टीचे उमर अयुब त्यांच्या विरोधात उभे होते. नवाझ शरीफ यांच्या पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इमरान खानच्या पीटीआयद्वारा समर्थन दिलेल्या ९० हून अधिक अपक्ष उमेदवारांनी ३३६ सदस्यीय नॅशनल असेंब्लीत सर्वाधिक सीट ज्ािंकल्या होत्या. परंतू निवडणूकीनंतर झालेल्या युतीमध्ये मुत्ताहीदा कौमी मुव्हमेंट-पाकिस्तान (एमक्यूएम-पी), इस्तेकाम-ए-पाकिस्तान पार्टी आणि पाकिस्तान पीपुल्स पार्टी (पीपीपी) आदींनी पीएमएल-एन उमेदवाराला पाठींबा दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR