पुणे : फोडाफोडी हा सध्याच्या राज्य सरकारचा स्थायीभाव आहे. त्यामुळेच दहावीचा मराठीचा पेपर देखील फुटला असल्याची टीका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. विशेष म्हणजे मराठी भाषेचा देखील पेपर फुटत असेल तर हे दुर्दैवच असल्याचेही ते म्हणाले.
या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली आहे. आज मातृभाषा दिन असून दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु झाले आहे. त्याची आजच सुरुवात झाली आहे असे असताना महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा पेपर फुटत असेल तर हे दुर्दैव असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. लगे रहो महायुती सरकार, असे म्हणत त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. आता महाराष्ट्र थांबणार नाही, या महायुती सरकारच्या घोषवाक्याचा देखील रोहित पवार यांनी खोचक शब्द उल्लेख केला आहे.
या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, फोडाफोडी हा या सरकारचा स्थायीभाव असल्याने १० वीचा मराठी भाषेचाही पेपर फुटला. विशेष म्हणजे आज मातृभाषा दिन असून दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही आजच सुरवात झाली तरी मराठी भाषेचाही पेपर फुटत असेल तर हे दुर्दैवच आहेङ्घ लगे रहो महायुती सरकार! महाराष्ट्र आता थांबणार नाही!’