जोधपूर : आसाराम बापू याची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर १३ जानेवारीपासून रुग्णालयात उपचार सुरू जोधपूर येथील एआयआयएमसीमधे आसाराम बापूवर उपचार केले जात आहेत. योग वेदांत समितीने आज पत्रकार परिषद घेत दिली माहितीते सध्या कार्डियाक आयसीयूमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
तुरुंगात जाण्यापूर्वी वयाच्या ७४ व्या वर्षी बापू आसाराम बापूंना केवळ ट्रायजेमिनल न्युराल्जिया आणि पाठदुखीचा त्रास होत होता. आता वयाच्या ८६ व्या वर्षी ते हृदयविकार, प्रोस्टेट वाढणे, संधिवात आणि अशक्तपणा नवीन आजारांनी ग्रासले आहेत. एम्सच्या अहवालानुसार, त्याच्या हृदयात ३ गंभीर ब्लॉकेज आहेत (९९%, ९०% आणि ७५%). तसेच हिमोग्लोबिनची पातळी सतत घसरत असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत आहे.
त्यांची गंभीर शारीरिक स्थिती पाहता पॅरोलसाठी नुकताच दाखल केलेला अर्ज आजाराच्या तीव्रतेकडे दुर्लक्ष करून रद्द करण्यात आला. आसाराम बापूंना तणावमुक्त वातावरणात अनुकूल, उत्तम आणि त्वरित योग्य उपचार मिळावेत, अशी मागणी आसाराम आश्रम अहमदाबाद सत्संग वक्ता रामानंद आणि महिला उत्थान मंडल अहमदाबाद सत्संग वक्ता साधवी रेखा बहन यांनी केली.