22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयआसाराम बापूची शिक्षा माफीची याचिका फेटाळली

आसाराम बापूची शिक्षा माफीची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. आरोग्याच्या कारणास्तव बलात्कार प्रकरणातील शिक्षेला स्थगिती देण्याच्या आसाराम बापूच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

सर्वोच्च न्यायालयाने आसारामच्या वकिलास राजस्थान उच्च न्यायालयासमोर आपली मागणी मांडण्यास सांगितले. तसेच राजस्थान हायकोर्टाला आसारामची याचिका त्वरित निकाली काढण्यास सांगितले. आसारामने महाराष्ट्रातील पोलीस कोठडीत आयुर्वेदिक उपचाराची मागणी करणारी याचिका केली होती.

२०१८ मध्ये आसारामला जोधपूरमधील विशेष पोस्को न्यायालयाने बलात्कारासह विविध लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २ सप्टेंबर २०१३ पासून तो कोठडीत आहे, जेव्हा त्याला इंदूरमध्ये अटक करण्यात आली होती आणि त्याच वर्षी त्याच्या आश्रमात एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला जोधपूरला आणण्यात आले होते. किशोरीच्या तक्रारीनुसार, आसारामने तिला जोधपूरजवळील मनाई येथील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री तिच्यावर बलात्कार केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR