30.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअब्जावधींची राख, हजारोंचा बळी; इस्रायल-हमास युद्ध अखेर संपणार

अब्जावधींची राख, हजारोंचा बळी; इस्रायल-हमास युद्ध अखेर संपणार

जेरुसलेम : वृत्तसंस्था
इस्रायल आणि हमासमधील युद्ध संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अब्जावधींची राख आणि हजारोंचा बळी घेऊन हे युद्ध समझोत्याच्या टप्प्यात आले आहे. हमासने युद्धविरामाचा मसुदा स्वीकार केला असून इस्रायल यावर आणखी विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. यात अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांना सोडण्यास हमास तयार झाला आहे.

कतार या दोन्ही बाजुंमध्ये मध्यस्थी करत आहे. गाझामध्ये युद्धबंदी करण्यास आणि अपहृतांच्या सुटकेसाठी एक समझोता केला जात आहे. दोहामध्ये दोन्ही बाजुचे लोक उपस्थित असून चर्चा निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. हमासने अद्याप यावर काही घोषणा केलेली नसून इस्त्रायलच्या अधिका-यांनी पत्रकारांना याची माहिती दिली आहे.

यानुसार हमास पहिल्या टप्प्यात ३३ अपहृत नागरिकांची सुटका करणार आहे. यात मुले, महिला आणि सैनिक व ५० हून अधिक वयाचे पुरुष, जखमी आणि आजारी लोक असणार आहेत. हमासने अपहरण केलेले लोक जिवंत असतील अशी अपेक्षा इस्त्रायलला आहे.

पहिला टप्पा पूर्ण झाला की १६ दिवसांनी उरलेल्या अपहृत नागरिकांना सोडण्याची चर्चा केली जाणार आहे. यामध्ये पुरुष सैनिक आणि तरुणांना सोडले जाणार आहे. मृतांचा मृतदेहही दिला जाणार आहे. तसेच सैन्याची माघार टप्प्याटप्प्याने घेतली जाणार आहे. फिलाडेल्फी कॉरिडॉरच्या संरक्षणासाठी इस्रायली सैन्य तैनात केले जाईल. सैन्य मागे घेतले तरी सीमेजवळील शहरे आणि गावांचे संरक्षण करण्यासाठी इस्रायली सैनिक तैनात राहणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR