32.2 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeधाराशिवअस्मिता भोसलेचा आयआयटीला निवड झाल्याबद्दल तहसीलदारांच्या हस्ते सत्कार

अस्मिता भोसलेचा आयआयटीला निवड झाल्याबद्दल तहसीलदारांच्या हस्ते सत्कार

धाराशिव : प्रतिनिधी
तालुक्यातील बेंबळी येथील अ‍ॅड. विजय भोसले यांची कन्या अस्मिता भोसले या विद्यार्थिनीची आयआयटी गुवाहटी येथे निवड झाली आहे. या यशाबद्दल धाराशिवच्या तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून अस्मिताचा सत्कार करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार शिवानंद स्वामी, धाराशिव शहर मंडळाचे मंडळाचे मंडळ अधिकारी श्रीनिवास पवार, तलाठी संजयकुमार माळी उपस्थित होते.

अस्मिता भोसले ही बेंबळी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थीनी आहे. तीचे वडील विजय भोसले हे धाराशिव येथील जिल्हा न्यायालयात विधीज्ञ आहेत. अस्मिताचे प्राथमिक शिक्षण धाराशिव शहरातील ग्रीनलँड इंग्लिश स्कूलमध्ये झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण राजस्थान राज्यातील कोटा येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये झाले. तीची आयआयटी गुवाहटी येथे मेकॅनिकल बॅ्रंचसाठी निवड झाली आहे. या यशबादद्ल अस्मिताचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR