25.3 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये सरपंचाची हत्या; मस्साजोग गावामध्ये तणाव

बीडमध्ये सरपंचाची हत्या; मस्साजोग गावामध्ये तणाव

बीड : प्रतिनिधी
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यानंतर हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकरी आक्रमक झाले आहेत. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात पवनचक्की कंपनी व कॉन्ट्रॅक्टरवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. तर या घटनेने मस्साजोग गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मयत संतोष देशमुख व त्यांचा वाहनचालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. त्यावेळी डोणगावजवळ दोन वाहनांतून येऊन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून तोडफोड केली. त्यानंतर संतोष देशमुख यांचे अपहरण केले असल्याची तक्रार केज पोलिस ठाण्यात आज दुपारनंतर दाखल करण्यात आली होती.
मात्र काही तासांनंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली जात आहे.

पवनचक्कीच्या वादातून खून : खासदाराचा आरोप
बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे. तर हा खून मस्साजोग येथील पवनचक्कीच्या वादातून आणि खंडणीच्या वादातून झाला आहे. याविषयी मी पोलिस अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना फोन केला, मात्र ते देखील माझा फोन उचलत नाहीत, असा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे..

ग्रामस्थांचा रास्ता रोको
बीडच्या केज तालुक्यात असणा-या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून काल खून करण्यात आला आहे. याप्रकरणी आता मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून आरोपींना तात्काळ अटक करा, त्यांच्यावर कडक कारवाई करा, ही मागणी घेऊन ग्रामस्थांनी बीड-अंबाजोगाई महामार्ग अडवत मस्साजोग येथे रास्ता रोको केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR