18.1 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये जरांगेंची सभा; वाहतुकीच्या मार्गामध्ये मोठे बदल

बीडमध्ये जरांगेंची सभा; वाहतुकीच्या मार्गामध्ये मोठे बदल

बीड : २३ डिसेंबर रोजी बीडमध्ये मनोज जरांगे यांची निर्णायक इशारा सभा होत आहे. दरम्यान, याच सभेची जय्यत तयारी सुरू असून, शहरातील बीड बायपास रोडवर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर, सभास्थळाची पाहणी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केली आहे. विशेष म्हणजे, जरांगे यांच्या सभेच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिका-यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाल्यानंतर सभेच्या दिवशी धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय झाला आहे.

मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. परंतु, ही मुदत संपण्यापूर्वी २३ डिसेंबर रोजी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे.

याच सभेमधून २४ डिसेंबरनंतरची आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे बीडमधील सकल मराठा बांधवांच्या वतीने या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. तब्बल शंभर एकरावर ही सभा होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR