मुंबई : अटल सेतू-मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या पुलाचं उद्घाटन उद्या (१२ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. पण या पुलाची वैशिष्ट्ये ऐकून तुम्ही चक्रावून जाल. कारण आशियातील सर्वांत लांब, जगातील पहिलं तंत्रज्ञान यांसह अनेक आश्चर्यकारक बाबी या पुलाबाबत आहेत.
हा भारतातील सर्वात लांब पूल असून भारत आणि आशियातील सर्वात मोठा समुद्रातील पूल आहे. या पुलासाठी तीन विभागात काम करण्यात आलं आहे. यामध्ये जमिनीवरचा पूल, समुद्रात एक पूल आहे तसेच खडकावरही पुलाचं काम करण्यात आलं आहे.
या पुलामध्ये वापरलेलं स्टील हे आयफेल टॉवरपेक्षा १७ पट जास्त आह. तसेच स्ट्रक्चरल स्टील जे वापरण्यात आलं आहे ते हावडा ब्रीजपेक्षा चार पट अधिक आहे. यामध्ये जे काँक्रिट वापरण्यात आलं आहे ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा सहा पट अधिक आहे.
मुंबई शहराला नवी मुंबईशी जोडतो हा एक ऐतिहासिक पूल बनला आहे. पुढे या पुलाला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेला जोडण्याची योजना केली जात आहे. नंतर जेव्हा मल्टिमोडल कॉरिडॉर बनेल तेव्हा त्याला देखील हा पूल जोडला जाईल.
या पुलावरुन चारचाकीपासूनवरील सर्व प्रकारची वाहनं यावरुन धावतील. दुचाकी, ऑटो रिक्षा, सायकल आणि हातगाड्या यावरुन जाऊ शकणार नाहीत. कारण सुरक्षेचा एक विषय आहे.
यामध्ये टोल घ्यावा लागणार आहे कारण जपान सरकारच्या जायका या आर्थिक संस्थेकडून कर्ज घेऊन उभारण्यात आला आहे. त्यामुळं या कर्जाची पण परतफेड करावी लागणार आहे.
ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम बसवण्यात आलं आहे ते भारतातील सर्वात अत्याधुनिक आहे. यामध्ये १९० तर थर्मल कॅमेरे आहेत. कारण यामध्ये धुकं आलं व्हिसिबिलिटी कमी झाली तरी हे कॅमेरे ते टिपू शकतील.