29.2 C
Latur
Monday, February 10, 2025
Homeराष्ट्रीयआतिशी मार्लेना आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

आतिशी मार्लेना आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्या सकाळी ११ वाजता राजभवन येथे उपराज्यपालांना भेटतील आणि त्यांना राजीनामा सादर करतील. शनिवारी आलेल्या निवडणूक निकालांमध्ये भाजपला ४८ आणि आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या. भाजपकडून अद्याप मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केलेले नाही.

दिल्ली भाजप अध्यक्ष आज संध्याकाळी सर्व विजयी आमदारांना भेटतील. पंतप्रधान मोदी परदेश दौ-यावरून परतल्यानंतर दिल्लीत शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील विजयानंतर भाजपच्या छावणीत आनंदाचे वातावरण आहे. नायब सिंग सैनी हरियाणा भवन येथे जलेबी पार्टीचे आयोजन करतील. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी जिलेबी बनवल्या जात आहेत. मुख्यमंत्री आतिशी सकाळी ११ वाजता राजभवनात जातील आणि उपराज्यपालांना राजीनामा सादर करतील. आतिशी यांनी रमेश बिधुरी यांचा ३,५०० पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये, आम आदमी पक्षाच्या प्रमुख नेत्या आतिशी यांनी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. या विजयामुळे पक्षाला भाजपचे वर्चस्व असलेल्या विधानसभेत प्रभावीपणे आवाज उठवण्याची संधी मिळेल.

आतिशी यांनी भाजपचे रमेश बिधुरी यांचा ३५०० हून अधिक मतांनी पराभव केला आहे. आम आदमी पक्षाचे अनेक मोठे नेते निवडणुकीत पराभूत झाले. अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. मनीष सिसोदिया यांना जंगपुरा मतदारसंघातूनही पराभवाचा सामना करावा लागला आहे. सौरभ भारद्वाज देखील ग्रेटर कैलाशमधून निवडणूक हरले.

‘आप’चे तीन मंत्री विजयी
पक्षाचे तीन मंत्री निवडणुकीत विजयी झाले आहेत. आप सरकारमध्ये मंत्री असलेले गोपाल राय, मुकेश अहलावत आणि इम्रान हुसेन यांनी त्यांच्या जागांवरून विजय मिळवला आहे. बाबरपूरमधून गोपाल राय १८,९९४ मतांनी, सुलतानपूर मजरामधून मुकेश अहलावत १७,१२६ मतांनी आणि बल्लीमारनमधून इम्रान हुसेन २९,८२३ मतांनी विजयी झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR