22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रघरगुती वादातून गॅस सिलिंडर लीक करून पत्नी-मुलांना जाळण्याचा प्रयत्न

घरगुती वादातून गॅस सिलिंडर लीक करून पत्नी-मुलांना जाळण्याचा प्रयत्न

नागपूर : घरातील किरकोळ वादातून संतापलेल्या एका व्यक्तीने चक्क आपल्या पत्नी आणि मुलांना एका खोलीत बंद करून गॅस सिलिंडर लीक करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, त्यांच्या पत्नीने वेळीच समयसूचकता दाखवत आरडाओरड करत ही बाब पोलिस आणि नातेवाईकांच्या लक्षात आणून दिल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. ही थरारक घटना नागपूरच्या कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओमनगरमधील जगनाडे ले-आऊट भागात घडली आहे.

दरम्यान रंजन गणेशप्रसाद शाव (वय ४३, रा. युनिक शैलपुत्री अपार्टमेंट), असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. तर रंजनच्या पत्नी मीनू (वय ४३), त्यांचा १४ वर्षीय मुलगा आणि आठ वर्षीय मुलगी, अशी थोडक्यात बचावलेल्यांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रंजन हे एका को-ऑपरेटिव्ह बँकेत मुख्य लिपिक म्हणून कार्यरत आहे. त्यांचा तापट स्वभाव असल्याने यापूर्वी देखील त्यांचा आपल्या पत्नीसोबत वाद झाला होता. त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन रंजन यांनी आपल्या पत्नी मीनूला मारहाण देखील केली होती. मात्र सोमवारच्या दुपारी त्यांच्यात परत एकदा काही कारणावरून वाद उफाळून आला.

त्यानंतर रंजन यांनी रागाच्या भरात घरातील गॅस सिलिंडरचा पाईप काढला आणि पत्नी मीनू आणि त्यांच्या दोन मुलांना एका खोलीत डांबले. त्यानंतर हातात माचिस घेऊन रंजन यांनी ‘तिघांना संपवूनच टाकतो’ अशी धमकी दिली. अल्पावधीतच घरभर गॅस पसरला आणि भीतीपोटी मीनू आणि त्यांच्या दोन मुलांनी आरडाओरड सुरू केली. सोबतच आपल्या भावाला देखील याबाबत कळवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR