22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरछबिन्यात नाचणाऱ्या तरूणाच्या खूनाचा प्रयत्न

छबिन्यात नाचणाऱ्या तरूणाच्या खूनाचा प्रयत्न

सोलापूर : करमाळा तालुक्यातील घोटी येथील यात्रेत छबिन्याच्या मिरवणुकीत नाचणाऱ्या तरूणाचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सातजणांविरुध्द करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ऋत्विक चंद्रकांत चव्हाण (वय २४, रा. सर्वे नं. ३०, आदर्श इंदिरा नगर, येरवडा, आळंदी रस्ता, पुणे) याच्या फिर्यादीवरुन आनंद किशन खंडागळे (वय ३५), सुरज किशन खंडागळे (वय ३३), किशन संजय थोरात (वय ३२), किशोर संजय थोरात (वय ३१), किशन खंडागळे (वय ५०), शुभम खंडागळे (वय २७), ओम चव्हाण (वय २६, सर्व रा. घोटी, ता. करमाळा) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोटी येथील यात्रेत छबिना मिरवणुक निघाली होती. ऋत्विक चव्हाण हा गावात छबिना मिरवणुक पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी मध्यरात्री एकच्या सुमारास ऋत्विक चव्हाण हा छबिन्यात नाचत होता. नाचताना मला का बघतो असे म्हणून आनंद खंडागळे याने भांडण काढले. यावेळी छबिन्यात नाचणाऱ्या ऋत्विक चव्हाणला बाहेर घेऊन आनंद खंडागळे व त्याच्या साथीदारांनी गळा दाबून शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच सुरज खंडागळे, ओम चव्हाण, शुभम खंडागळे यांनी त्याच्या हातातील लोखंडी धारदार शस्त्राने ऋत्विकच्या बरगडीच्या खाली शस्त्राने मारून त्याच्या खूनाचा प्रयत्न केला. म्हणून करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक चंदनशिवे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR