30.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रगव्हाणीत उड्या मारुन गाळप बंद पाडण्याचा प्रयत्न

गव्हाणीत उड्या मारुन गाळप बंद पाडण्याचा प्रयत्न

सांगली : ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून स्वाभिमानीकडूनन महाराष्ट्राभ आंदोलन करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील शुक्रवारी ऊस दरासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गव्हाणीत उड्या मारुन गाळप बंद पाडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील साखराळे येथील राजारामबापू साखर कारखान्यामध्ये हा प्रकार घडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यात घुसत उसाच्या गाळपसाठी असणाऱ्या गव्हाणीत थेट उड्या मारल्या.

या ठिकाणी साखर कारखान्याचा आतील ऊस काटा बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांकडून या ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांचा दबाव झुगारून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या आत घुसून उसाचा गाळप बंद पाडण्यासाठी उसाच्या गव्हाणीत थेट उड्या मारल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR