25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न

अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर येथील घटना पोलिसांत गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरात अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सुदानमधून शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आलेल्या एका महाविद्यालयीन तरुणाने दहावीत शिकणा-या दोन अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा हा आरोप आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तरुणाला सिटी चौक पोलिसांनी अटक केली असून, ओसामा अली युसूफ अहेमद (वय २३ वर्षे, रा. सुदान, उत्तर आफ्रिका) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शिव छत्रपतीनगर, हडको येथील १५ वर्षीय वीरेंद्र (नाव काल्पनिक) दहावीत शिकतो. २१ डिसेंबरला रात्री ९ वाजता तो जेवण करून गल्लीत फिरण्यासाठी बाहेर पडला. तेव्हा त्याचा मित्र देवेंद्र (नाव काल्पनिक) त्याला भेटला. दोघेही गप्पा मारत थांबले असता, बाजूच्या एका घराच्या गॅलरीतून आरोपी ओसामाने त्यांना वर बोलावले. त्यामुळे दोघेही घरात गेल्यावर ओसामाने आतून दरवाजाची कडी लावून घेतली. त्यांना समोर बसण्यास भाग पाडून एका कागदावर तो काहीतरी लिहायला लागला.

तोच कागद जाळून त्याचा धूर वीरेंद्र आणि देवेंद्रच्या तोंडावर सोडत होता. त्यांना इस्लाम धर्माबाबत माहिती सांगून बळजबरी धर्मांतर करण्याचा प्रयत्न तो करू लागला. तसेच, तो जे बोलेल ते शब्द म्हणायला भाग पाडू लागला. त्याला नकार देताच आरोपीने घरातील वस्तू मुलांच्या दिशेने फेकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घाबरलेल्या वीरेंद्र व देवेंद्रने स्वत:ची कशीबशी सुटका करून घेत तेथून पळ काढला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR