पंढरपूर : आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा १७ रोजी साजरा होत आहे. या सोहळ्याकरिता संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्यासह असंख्य पालख्या, दिंडया पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. पंढरपूर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्ददिखील बाढत आहे. त्यामुळे मंदिर समितीकडून यात्रेची जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे. त्याचाच एक भाग माणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
त्यामुळे मंदिर आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विद्युत रोषणाईत उजाळून निघाले आहे. आषाढी यात्रा ही वर्षभरातील सर्वात मोठी यात्रा आहे. त्यामुळे या यात्रेला १८ ते २० लाख भाविक येतात. येथे येणाऱ्या भाविकांची सेवा करता यावी, दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आत्मिक समाधान मिळावे महणून मंदिर समितीच्या वतीने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईकरण्यात आलेली आहे.
रात्रीच्यावेळी या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे विठ्ठल मंदिर उजाळून निघाल्याचे नयनरम्य दृश्य दिसून येत आहे. ही आकर्षक विद्युत रोषणाई पाहून भाविक आनंदी होत असून दिवाळी असल्याचा भास भाविकांना होत असल्याचे चित्र दिसून येते. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील विनोद संपत जाधव या भक्ताने मोफत विद्युत रोषणाई केली आहे.विनोद जाधव हे शिवरात्न डेकोरेटर्सचे मालक आहेत.
त्यांनी आठवड्याभराच्या अथक प्रयत्नांनंतर मंदिरावर ही विद्युत रोषणाई साकारली आहे.आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, नामदेव पायरी, संत तुकाराम भवन, संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप सातमजली हे विद्युत रोषणाईत उजळून निघाले आहेत. मंदिरातील अंतर्गत भागात विठ्ठल सभामंडप, सोळखांबी, चारखांबी, बाजीराव पडसाली आदी ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अगोदरही गेल्या आठ वर्षांपासून जाधव हे विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई मोफत करत
असल्याचे मंदिर समितीचेव्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.